Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik) header
Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik) profile picture

Former Member of Parliament Thane Lok Sabha Constituency | First Mayor of the Satellite City Navi Mumbai | Bharatiya Janata Party @BJP4India | Navi Mumbai

Joined April 2023
Photo by Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik)Photo by Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik)Photo by Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik)Photo by Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik)Photo by Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik)Photo by Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik)Photo by Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik)Photo by Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik)Photo by Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik)Photo by Dr. Sanjeev Naik (@misanjeevnaik)
🟧 नवी मुंबई शहराला देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचा मानाचा पुरस्कार! अभिमान नवी मुंबईचा, गौरव प्रत्येक नवी मुंबईकराचा! नवी दिल्ली येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये नवी मुंबई शहराने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक पटकावत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला आहे. महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबईच्या महापौर सौ.सुजाता पाटील यांनी स्वीकारला. नवी मुंबईकर नागरिकांचा सक्रिय सहभाग, अहोरात्र शहराच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि महानगरपालिका प्रशासनाची कार्यतत्परता या सर्वांच्या एकत्रित योगदानातूनच हे ऐतिहासिक यश साकार झाले आहे. हा पुरस्कार म्हणजे प्रत्येकाच्या समर्पणाचा, सामूहिक प्रयत्नांचा आणि स्वच्छतेप्रती असलेल्या अढळ कटिबद्धतेचा राष्ट्रीय गौरव आहे. नवी मुंबईने स्वच्छतेच्या क्षेत्रात मिळविलेल्या या यशामागे शहरात राबविण्यात येणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणा, शास्त्रोक्त कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कचरा वर्गीकरण, संकलन आणि शास्त्रोक्त विल्हेवाटीसह घनकचरा व्यवस्थापनावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेने आय-ट्रिपल-सी (एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर) ही आधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या केंद्राच्या माध्यमातून कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे मार्ग, घंटागाड्यांचे थेट निरीक्षण (लाईव्ह ट्रॅकिंग), स्वच्छता कर्मचाऱ्यांची वॉर्डनिहाय बायोमेट्रिक उपस्थिती तसेच डम्पिंग ग्राउंडच्या स्थितीवर रिअल-टाइम देखरेख ठेवली जाते. यासोबतच तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, कोपरखैरणे येथील जुन्या क्षेपणभूमीचे शास्त्रोक्त पद्धतीने बंदीकरण करून त्या जागेवर विकसित करण्यात आलेले निसर्गोद्यान आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा हेही नवी मुंबईच्या स्वच्छता व्यवस्थेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरले आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्याने तसेच औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी केला जात आहे. अशा विविध आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे नवी मुंबईच्या स्वच्छता व्यवस्थेला राष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे. देशात स्वच्छतेचा प्रथम मान मिळविणाऱ्या नवी मुंबईच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व नवी मुंबईकरांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक आभार! ═════════════════ संजीव गणेश नाईक माजी खासदार, ठाणे लोकसभा ═════════════════ #PresidentDroupadiMurmu #SujataSurajPatil #SanjeevGaneshNaik #NaviMumbai #SwachhNaviMumbai #SwachhSurvekshan2025 #SwachhSurvekshan2026 #No1CleanestCity #SwachhBharatMission #CleanestCityIndia #PrideOfNaviMumbai #NaviMumbaiPride #NationalAward #NaviMumbaiMunicipalCorporation #NMMC #CleanCityGreenCity #SwachhataHiSeva @rashtrapatibhvn @mlkhattar @Dev_Fadnavis @NaikSpeaks @SujataP88512 @NMMConline @NMMCCommr
1
36
दिवाळीच्या औचित्याने भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांची सस्नेह भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या! ═════════════════ संजीव गणेश नाईक माजी खासदार, ठाणे लोकसभा ═════════════════ #Diwali2026 #RavindraChavan #SanjeevGaneshNaik #BJP #BJPMahashtra #Thane #NaviMumbai #Diwali #DiwaliGreetings #Deepavali @RaviDadaChavan
🤖 Made with AI
2
16
आप सभी को और आपके पूरे परिवार को स्नेह, विश्वास और अटूट प्रेम के पर्व 'भाई दूज' की ढेरों शुभकामनाएँ! #BhaiDooj #Bhaubij #BrotherSisterLove #SiblingBond #भाईदूज2026 #भाईबहन_का_प्यार
1
21
ज्ञान हीच खरी शक्ती! स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिल्पकार आणि थोर विचारवंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन! आजचा राष्ट्रीय शिक्षण दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा नसून, प्रत्येक बालकापर्यंत चांगल्या शिक्षणाचा हक्क पोहोचवण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. चला, ज्ञानाचा प्रकाश पसरवूया आणि एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती करूया! सर्वांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #NationalEducationDay #MaulanaAbulKalamAzad #PowerOfEducation #InspiringIndia #NationalEducationDay2026 #SanjeevGaneshNaik
1
17
भाऊबीजेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! बहीण आपल्या भावाला औक्षण करते. औक्षणाची ही प्रथा अत्यंत मंगलमय असून ज्योतीचा मंगलमय प्रकाश आणि स्नेह नात्यांची वीण अधिक घट्ट करणारा असतो.. समाजातील प्रत्येक भगिनीच्या सुरक्षिततेसाठी दक्ष राहणे हे आज प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही भावना प्रत्येकामध्ये जागृत होणे हीच खरी भाऊबीज... आजच्या या पवित्र सणाला केवळ नात्यांचा गोडवाच नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा संकल्प आपण सगळे मिळून करूया! #भाऊबीज #Bhaubeej #WomenSafety #Diwali2026 #SocialAwareness #BrotherSisterBond #SanjeevGaneshNaik
53
"जिथे प्रेमाचा ओलावा आणि विश्वासाचा धागा असतो, तिथे प्रत्येक दिवस भाऊबीजेसारखा सण बनतो!" सर्व लाडक्या भाऊ-बहिणींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमचा हा स्नेह असाच जन्मोजन्म टिको, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ═════════════════ संजीव गणेश नाईक माजी खासदार, ठाणे लोकसभा ═════════════════ #Bhaubij2026 #BrotherSisterLove #BhaiDooj #भाऊबीज #FestivalVibes
1
4
174
ऐरोली येथे दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘दीपसंध्या’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित...काही खास क्षणचित्रे!... ═════════════════ संजीव गणेश नाईक माजी खासदार, ठाणे लोकसभा ═════════════════ #DeepSandhya #SanjeevGaneshNaik #DiwaliCelebrations #Diwali2026 #Airoli #NaviMumbai #KaraokeCompetition #BanduKeni #BJPNaviMumbai
22
📌 सुरेल स्वरांनी उजळली ऐरोलीची 'दीपसंध्या'! ऐरोली येथे दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘दीपसंध्या’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला आणि सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. भाजपचे नगरसेवक श्री. बंडू केणी आणि समाजसेविका सौ. राजश्री केणी यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात नागरिकांसाठी खास कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या सुरेल सादरीकरणाने ‘दीपसंध्या’चा हा सोहळा अधिकच अविस्मरणीय ठरला. अशा सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र आणण्यासोबतच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो. दिवाळीच्या या मंगलमय पर्वात आनंदाचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील , नगरसेवक श्री. शिवाजी खोपडे, नगरसेविका सौ. श्रेया जिरगे, मा. नगरसेवक श्री. जी.एस.पाटील , समाजसेवक ॲड. श्री. दीपक गायकवाड, समाजसेवक श्री. सुदर्शन जिरगे, समाजसेवक श्री.निकेतन पाटील ,समाजसेविका सौ. संध्या सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ═════════════════ संजीव गणेश नाईक माजी खासदार, ठाणे लोकसभा ═════════════════ #DeepSandhya #SanjeevGaneshNaik #DiwaliCelebrations #Diwali2026 #Airoli #NaviMumbai #KaraokeCompetition #BJPNaviMumbai
1
19
कामगार चळवळीचे मार्गदर्शक, प्रखर विचारवंत आणि भारतीय मजदूर संघाचे संस्थापक आदरणीय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! "राष्ट्रहितासाठी कामगार, कामगारांच्या हितासाठी काम" या विचाराने त्यांनी भारतीय कामगार क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांचे राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि स्वावलंबनाचे विचार आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील. #DattopantThengadi #दत्तोपंत_ठेंगडी
18
गोवर्धन पूजेच्या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा! गोवंशाचे रक्षण करूया आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. या शुभ दिनी भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तुमच्या घरात अन्न-धान्याची समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहो, हीच सदिच्छा! शुभ गोवर्धन पूजा! #GovardhanPuja #गोवर्धनपूजा #श्रीकृष्ण #गोवंश #HappyGovardhanPuja #Diwali2026
21
नवीन वर्ष, नवीन उमेद आणि नव्या उत्साहाची सुरुवात! बलीप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या या मंगल प्रसंगी, आपल्या आयुष्यात आनंदाची नवी किरणे पडावीत आणि प्रत्येक दिवस सुख-समृद्धीने उजळून निघो, हीच सदिच्छा. सुवर्णमयी पाडव्याच्या आणि बलिप्रतिपदेच्या तुमच्या आणि तुमच्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #BaliPratipada #DiwaliPadwa #दिवाळीपाडवा #नवीनवर्ष #मराठीसंस्कृती #FestivalVibes #MarathiTradition #ShubhDeepawali
20
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना मुंबई येथे 'संदीप नाईक प्रतिष्ठान'च्या वतीने माजी आमदार संदीप नाईक यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये १,००,००,००० रुपये देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी आपल्यासह सभागृह नेते सागर नाईक उपस्थित होते. #SandeepNaikPratishthan #CMReliefFund #DevendraFadnavis #Maharashtra #SanjeevGaneshNaik
1
40
"न्यायाची दारे प्रत्येकासाठी खुली असावीत, कोणताही घटक न्यायापासून वंचित राहू नये..." राष्ट्रीय विधी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! समाजातील गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर मदत पुरवून त्यांना न्यायाचा हक्क मिळवून देणाऱ्या सर्व विधी सेवा प्राधिकरणांचे आणि वकिलांचे मनःपूर्वक आभार! चला, कायदेशीर साक्षरता वाढवूया आणि न्यायावर आधारित समतावादी समाज घडवूया! #NationalLegalServicesDay #LegalServicesDay #JusticeForAll
33
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर मुत्सद्दी आणि ज्येष्ठ नेते डॉ. के. आर. नारायणन यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! अथांग विद्वत्ता, निष्कलंक सार्वजनिक जीवन आणि राज्यघटनेच्या मूल्यांचे खंबीर रक्षक म्हणून त्यांनी देशसेवेत दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. भारताचे पहिले दलित राष्ट्रपती म्हणून त्यांनी सामाजिक समता आणि लोकशाहीच्या परंपरा अधिक समृद्ध केल्या. त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम! #KRNarayanan #FormerPresident #SocialJustice #IndianDiplomacy #Tribute #Punyatithi #Remembrance #India
1
18
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णासाहेब कर्वे) यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करणारे, पुनर्विनवाह चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आणि भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना करणारे महान समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम! त्यांनी महिलांचे सक्षमीकरण आणि शिक्षणासाठी आयुष्यभर केलेले कार्य आजही समाजोपयोगी प्रेरणा देत आहे. #MaharshiKarve #DhondoKeshavKarve #SocialReformer #WomenEmpowerment #BharatRatna #Tribute #Remembrance #Maharashtra
2
27
भिवंडी येथे ‘अप्पर ठाणे दिवाळी पहाटोत्सव’ उत्साहात संपन्न !.... काही खास क्षणचित्रे!... ═════════════════ संजीव गणेश नाईक माजी खासदार, ठाणे लोकसभा ═════════════════ #DiwaliUtsav2026 #SanjeevGaneshNaik #DiwaliPahat #Bhiwandi #Thane #Diwali2026 #MusicalEvent #DiwaliCelebrations #FestivalOfLights #MarathiCulture #HappyDiwali
38
📌 दिवाळी २०२६ | बोनकोडे येथील कार्यालयीन पूजन आणि सहकाऱ्यांसोबत आनंदाचे काही खास क्षणचित्रे!... ═════════════════ संजीव गणेश नाईक माजी खासदार, ठाणे लोकसभा ═════════════════ #DiwaliUtsav2026 #SanjeevGaneshNaik #DiwaliCelebration #Diwali2026 #OfficeDiwali #DiwaliPujan #FestivalOfLights #Bonkode #NaviMumbai #FestiveVibes #HappyDiwali
1
16
📌 भिवंडी येथे ‘अप्पर ठाणे दिवाळी पहाटोत्सव’ उत्साहात संपन्न ! भिवंडी येथे स्व.अंकुश पाटील मित्र मंडळ व अप्पर ठाणे श्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अप्पर ठाणे दिवाळी पहाटोत्सव’ या सांगीतिक सोहळ्यास उपस्थिती लाभली. याप्रसंगी सर्वांशी संवाद साधत सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या मंगलमय पर्वात पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सुरेल संगीताचा आनंद अनुभवण्याची ही एक सुंदर पर्वणी ठरली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि संगीताची परंपरा जपत नागरिकांना एकत्र आणण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजकांनी राबविला. या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्री.अरुण पाटील, श्री.विश्वनाथ वझे, श्री.राम माळी, श्री.सुरेशकांत पाटील, श्रीमती पूनम पाटील, श्री. दीपक म्हात्रे, श्री.स्वप्नील शिंगे, श्री. विक्रम चव्हाण आणि श्री. भारत म्हात्रे व इतर उपस्थित होते . ═════════════════ संजीव गणेश नाईक मा. खासदार, ठाणे लोकसभा ═════════════════ #DiwaliUtsav2026 #SanjeevGaneshNaik #DiwaliPahat #Bhiwandi #Thane #Diwali2026 #MusicalEvent #DiwaliCelebrations #FestivalOfLights #MarathiCulture #HappyDiwali
23
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण ! यानिमित्ताने आज बोनकोडे येथील कार्यालयात पूजन करून कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले. यावेळी सर्व कर्मचारी वर्गाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ═════════════════ संजीव गणेश नाईक माजी खासदार, ठाणे लोकसभा ═════════════════ #DiwaliUtsav2026 #SanjeevGaneshNaik #DiwaliCelebration #Diwali2026 #OfficeDiwali #DiwaliPujan #FestivalOfLights #Bonkode #NaviMumbai #FestiveVibes #HappyDiwali
22
शुभ दीपावली! दिव्यांचा हा तेजोमय उत्सव तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाचा प्रकाश घेऊन येवो! माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या घरात सदैव ऋद्धी-सिद्धी, शांती आणि भरभराट राहो हीच सदिच्छा. तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #शुभदीपावली #दिवाळीच्याहार्दिकशुभेच्छा #HappyDiwali #FestivalOfLights #Diwali2026 #DiwaliWishes
1
3
118