ज्ञान, विज्ञान आणि साहित्याचा अथांग सागर असलेले मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय शिक्षण प्रणालीला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. त्यांच्या दूरगामी शैक्षणिक धोरणांमुळेच आज भारताची तरुण पिढी जगभरात देशाचा तिरंगा उंचावत आहे. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम!
#EducationDay #MaulanaAbulKalamAzadJayanti #AtmanirbharBharat
7
154
भावा बहिणीचा हा सण केवळ औक्षणापुरता मर्यादित नसून तो एकमेकांप्रती असणाऱ्या अथांग आदराचे प्रतीक आहे. बहिणीचे प्रेमळ आशीर्वाद आणि भावाची भक्कम साथ हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे.
भाऊबीजेच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
#BhauBeej2026 #भाऊबीज #WomenSafety #diwali2026
5
226
बारामती येथील साई ग्रुप आणि डेव्हलपर्स यांच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘सुनंदा पार्क – फेज ५’ या नूतन गृहप्रकल्पाच्या भव्य उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिलो.
या नवीन गृहप्रकल्पाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. साई ग्रुप आणि डेव्हलपर्सच्या भावी व्यावसायिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या हातून भविष्यातही असेच दर्जेदार प्रकल्प घडत राहो, ही सदिच्छा!
36
490
बारामती येथील साई ग्रुप आणि डेव्हलपर्स यांच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘सुनंदा पार्क – फेज ५’ या नूतन गृहप्रकल्पाच्या भव्य उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिलो.
या नवीन गृहप्रकल्पाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. साई ग्रुप आणि डेव्हलपर्सच्या भावी व्यावसायिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या हातून भविष्यातही असेच दर्जेदार प्रकल्प घडत राहो, ही सदिच्छा!
#Baramati #बारामती #SunandaPark #सुनंदापार्क #SaiGroupAndDevelopers
दादा कार डेकोर अँड ॲक्सेसरीज या नवीन व्यावसायिक दालनाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो. यावेळी नवीन व्यवसायाच्या भावी वाटचालीसाठी संचालकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
स्थानिक उद्योजकांनी अशाच प्रकारे पुढे येऊन
नव्या व्यवसायाची सुरूवात करावी. यातून भावी काळात इतरही तरुणांना व्यवसायाची प्रेरणा मिळणार आहे. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी ही आनंदाची बाब आहे. दादा कार डेकोर अँड ॲक्सेसरीजच्या
व्यवसायाची उत्तरोत्तर भरभराट होवो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#Baramati #बारामती #LocalBusiness #Entrepreneurship
दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बारामती येथील आर्माड सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस, या संस्थेच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो. संस्थेला भविष्यकालीन वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जय हनुमान ग्रुप, मल्हार आर्मी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री. सूर्यकांत (सुरेश भाऊ) कांबळे, तसेच आर्माड सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास गायकवाड, श्री. प्रवीण जगताप यांच्यासह इतर अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरक्षा आणि सेवा सुविधा क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून संस्थेने यशाची नवनवी शिखरे गाठावीत, अशी सदिच्छा व्यक्त केली.
#Baramati #बारामती #ArmadSecurity #आर्माडसिक्युरिटी #OfficeInauguration
2
102
📍 बारामती
बारामती नगरपालिका कंत्राटी कामगार बांधवांना दिवाळीनिम्मित फराळ वाटप.
#DiwaliWithWorkers #BaramatiNagarpadhit #MunicipalWorkers
10
200
पती-पत्नीच्या आणि कौटुंबिक नात्यांमधील प्रेमाचा, स्नेहाचा आणि विश्वासाचा हा उत्सव म्हणजे 'दिवाळी पाडवा'. या पावन पर्वावर फराळाच्या गोडव्याप्रमाणेच आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणि नात्यांमध्ये गोडवा कायम राहो.
दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!
#DiwaliPadwaSpecial #FamilyValues #ProsperousLife #DiwaliPadwa #diwali2026
4
157
अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या सर्व वैज्ञानिक आणि संशोधकांना सलाम. मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी विज्ञान वरदान ठरत आहे. नवे शोध घडत राहो, मानवी जीवन समृद्ध होत राहो. सर्वांना जागतिक विज्ञान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
#ScienceAndTechnology #FutureLeaders #STEM #ScienceForDevelopment
दीपावली सोमवती अमावस्येच्या पावन पर्वानिमित्त माळेगाव येथील श्री बाळूमामा मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांसमवेत भक्तिभावाने आरती करण्याचा आणि या मंगलमय सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला.
श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम असलेल्या या पवित्र स्थळी दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळेच समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. बाळूमामांच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.
बाळूमामांचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, हीच सदिच्छा!
#बाळूमामा #बाळूमामामंदिर #माळेगाव #बारामती #Balumama
1
8
185
दिवाळीमध्ये गडकिल्ले उभारणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा देण्यासारखे आहे. हीच ऐतिहासिक परंपरा काटेवाडी, ता. बारामती येथील धन्याची वस्ती येथे गेल्या ३० वर्षांपासून मोठ्या उत्साहाने जपली जात आहे.
लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या स्नेह, सहकार्य आणि सहभागातून यंदाही तिकोना किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आज सपत्नीक या किल्ल्याला भेट देऊन किल्ल्याचे रचनाकार आणि या उपक्रमात सहभागी असलेल्या सर्वांशी संवाद साधला. त्यांच्या कल्पकतेचे, मेहनतीचे आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक वाटले. अशा उपक्रमांतून आपला गौरवशाली इतिहास आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचत राहो, हीच सदिच्छा.
#काटेवाडी #ShivajiMaharaj #किल्ले_उभारणी #killespardha
1
25
480
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. या सणाचा आनंद सर्वांसोबत वाटता यावा, या भावनेतून बारामती नगरपरिषदेतील कंत्राटी कामगार बांधवांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप केले.
दिवस-रात्र आपल्या कामातून शहराच्या व्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या कामगार बांधवांशी यावेळी संवाद साधला आणि त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#DiwaliWithWorkers #BaramatiNagarpadhit #MunicipalWorkers #Baramati #बारामती
काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये आर. एस. ब्रदर्स या मेगा मॉलचे उद्घाटन झाले. त्यानिमित्ताने आज सपत्नीक आर. एस. ब्रदर्स मॉलला भेट दिली. यावेळी तेथील कपड्यांची गुणवत्ता आणि विविधता पाहून छान वाटले. बारामतीत अशा प्रकारचे नवनवीन उद्योग येत आहेत, याबद्दल मनापासून आनंद वाटतो. बारामतीच्या आर्थिक उलाढालीत यामुळे मोलाची भर पडेल. आर. एस. ब्रदर्स मेगा मॉलला पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#DiwaliWithWorkers #BaramatiNagarpadhit #MunicipalWorkers
1
22
1,037
धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे घडलेली आगीची दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. ऐन सणासुदीच्या काळात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू होणे, ही अत्यंत वेदनादायी घटना आहे.
या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे आत्मिक बळ त्यांच्या आप्तेष्टांना मिळो, ही प्रार्थना.
या दुर्घटनेतून बचावलेल्या व्यक्तीची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, हीच सदिच्छा!
#Maharashtra #Dharashiv #Condolences #Tribute #SocialResponsibility
22
576
फटाक्यांची रोषणाई, दिव्यांची आरास, रांगोळीचे रंग आणि सुगंधी फराळाचा आस्वाद... आपल्या समृद्ध संस्कृतीचा हा उत्सव प्रत्येक कुटुंबात आनंदाची उधळण घेऊन आला आहे.
आजच्या या पवित्र दिवशी माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो.
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#LakshmiPujaWishes #HappyDiwali #FestivalOfJoy
9
135
शब्दांमधून माणसं जिवंत करणाऱ्या आणि हास्याच्या माध्यमातून आयुष्य समृद्ध करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला समृद्ध करणाऱ्या पुलंनी मराठी माणसाला जगण्यातील विनोद शिकवला.
#PuLaDeshpande #Maharashtra #MarathiLiterature #MarathiCulture
दीपावलीच्या या तेजोमय दिवसांची सुरुवात आनंदाची उधळण करत होत आहे. आपल्या मनातील सर्व उदास विचार आणि नकारात्मकता नष्ट होऊन प्रत्येक कुटुंबात सुख-समृद्धीची नवी पहाट अवतरू दे.
जनसेवेच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर बनवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
#NarakaChaturdashi2026 #DiwaliCelebration #ProsperityAndSuccess #Diwali
6
156
'मेहता पब्लिशिंग हाऊस' चे संस्थापक अनिलजी मेहता यांचे कोल्हापूरमध्ये दु:खद निधन झालं. मराठी साहित्य विश्वात त्यांनी अनेक नवोदित लेखकांसाठी व्यासपीठ निर्माण केलं. मराठी प्रकाशन क्षेत्रात त्यांनी दिलेले अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली!
#AnilMehta #MehtaPublishingHouse #मेहता_पब्लिशिंग_हाऊस #अनिलजी_मेहता #भावपूर्ण_श्रद्धांजली
कोणताही आजार शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक खचण्याने अधिक जड होतो. जे नागरिक आणि त्यांचे परिवार या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत, त्यांना आपला मोलाचा धीर, सहानुभूती आणि भक्कम आधार देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनी आपण सर्वजण मिळून कर्करोगग्रस्तांना मानसिक बळ देऊया आणि एकात्मतेचा संदेश पसरवूया. निरोगी जीवनशैलीचा संकल्प करूया!
#NationalCancerAwarenessDay #राष्ट्रीयकर्करोगजागृतादिन #CancerAwareness #कर्करोगजागृती
7
128
भारतरत्न सर सी. व्ही. रामन यांच्या प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित 'रामन इफेक्ट' या युगांतकारी शोधाने जागतिक भौतिकशास्त्राला एक नवी दिशा दिली. चला त्यांच्या जयंतीदिनी विचारांतून प्रेरणा घेऊन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक मजबूत अन् 'आत्मनिर्भर भारत' घडवूया!
सर सी. व्ही. रामन यांच्या पावन चरणी कोटी-कोटी प्रणाम!
#CVRaman #RamanEffect #NationalScienceDay #PrideOfIndia #AtmanirbharBharat






























































